चिंताजनक : देशात चोवीस तासात 7964 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763




चिंताजनक : देशात चोवीस तासात 7964 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763


देशात मागील 24 तासात 7 हजार 964 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 73 हजार 763 वर पोहचली असून, मृतांची संख्या 4 हजार 971 एवढी आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 86 हजार 422 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कालच्या एका दिवसात 11 हजार 264 जणांची प्रकृती सुधारली असून आतापर्यंत 82 हजार 370 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 86 हजार 422 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर कालच्या एका दिवसात 11 हजार 264 जणांची प्रकृती सुधारली असून आतापर्यंत 82 हजार 370 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

जगभरात सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा देशामध्ये भारत सध्या नवव्या क्रमांकावर आहे. मात्र भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, ते 42.8 टक्क्यांवर पोहचले आहे. मुख्य म्हणजे योग्य ती काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कोरोना पासून किमान दूर राहणे शक्य आहे. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग चे पालन केल्यास कोरोनावर आपण वेगाने मात करणं शक्य होईल. 

दरम्यान, रविवारी लॉक डाऊन चा चौथा टप्पा संपत आहे. तसेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात लॉक डाऊनच्या पुढच्या टप याबाबत काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 









Post a Comment

0 Comments