नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो...
हा ब्लॉग चालु करण्याचे कारण की आपण आपल्या मायभूमी म्हणजेच् आपला महाराष्ट्र या बद्दल जाणुन घेण्यासाठी.
आपली नविन पिढी ही या मायभूमी बद्दल ऐकुन वा वाचून घ्यावी यासाठी माझ्या कडून हा छोटासा प्रयत्न. महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्या तलवारीच्या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्माला आली तशीच आपल्या अनुभव विश्वाच्या आणि शिकवणुकीच्या बळावर पोलादी समाज मन घडवणाऱ्या संत विभूतींनीही या भूमीला आपल्या अस्तित्वाने पावन केले आहे. साहित्य, काव्यशास्त्र संगीत आणि अष्टकलांची खाण असलेल्या शिवबाच्या या भूमीत तुम्ही-आम्ही जन्माला आलो. याचा निश्चितच सर्वांना अभिमान वाटणे साहजिकच आहे.
याच सगळ्या म्हपुरुषाची ओळख आपण या ब्लॉग द्वारे करनार आहोत.
तसेच महाराष्ट्रातील बातम्या या मराठीत, आपल्या आजीच्या गोष्टी,काही माहिती गोळा करुन मी तुम्हाला देणार आहे.
मराठी भाषेतून चालवले जाणारे एक संकेतस्थळ असून वाचकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यासह पर्यटन स्थळे आणि सामान्य ज्ञानात भर घालणारी माहितीही याद्वारे मराठीतून देण्यात येईल.
जितका रंजक इथला इतिहास तितकाच वैविध्यपूर्ण इथला निसर्गही!आपल्या महाराष्ट्रातील पर्यटनस्थळाची माहिती मी आपल्या पर्यंत आणुन देईल.
पहिला घास भरवणाऱ्या मायभूमीचे आणि पहिला शब्द बोलायला शिकवणाऱ्या मायबोलीचे ऋण कधीही फेडणे अशक्यच! मात्र तरीही माझा हा बालहट्ट...!
हि मायभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची
हा आमुचा आहे बाणा,
हि आमुची आहे बोली
हि आमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्य पताका
भगव्या जरीपटक्याची.
भगव्या जरीपटक्याची.
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची.
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची.
राकट देशा, कणखरं देशा,
दगडांच्या देशा
दगडांच्या देशा
प्रणाम माझा घ्यावा
हे श्री महाराष्ट्र देशा
हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा, वरदा, कृष्ण, कोयना,
भद्रा, गोदावरी
भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
मातीच्या घागरी
योग्यांची अन संतांची
भक्तांची, माळकर्यांची
हि देव, देश आणि धर्मासाठी
प्राण वेचणार्यांची
भक्तांची, माळकर्यांची
हि देव, देश आणि धर्मासाठी
प्राण वेचणार्यांची
योध्द्यांची अन वीरांची
तलवारीच्या पात्यांची
देशाचे रक्षण करण्यासाठी
जीव खर्चणार्यांची
तलवारीच्या पात्यांची
देशाचे रक्षण करण्यासाठी
जीव खर्चणार्यांची
हि भूमी सप्तसुरांची,
रंगांची अष्टकलांची,
काव्याची, शास्त्र, विनोदाची
हि भूमी साहित्याची
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची...
रंगांची अष्टकलांची,
काव्याची, शास्त्र, विनोदाची
हि भूमी साहित्याची
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची...
0 Comments